देवगड : किंजवडे येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. किंजवडे गावातील सर्व अंगणवाडी सेविका एकत्र येऊन किंजवडे खालचीवाडी येथे सदर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाचणी, तांदूळ ,खोबरे, वरी व पाले भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्यात आले होते.
यावेळी किरण टेंबुलकर यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, सध्या आपली खाण्याची जीवनशैली बदलली असून ती आरोग्यासाठी घातक आहे त्यामुळे पूर्वीच्या लोकांचा असलेला आहार हा आरोग्य किती फायद्याचा होता आणि पूर्वीच्या लोकांच्या आहारातील घटक वापरून या ठिकाणी पदार्थ बनविले आहेत ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यामुळे सहभाग घेतलेल्या सर्व महिलांनी याकडे स्पर्धा म्हणून न पाहता आरोग्याचा भाग म्हणून पहावे.

सूत्रसंचालन किंजवडे जि प खालचीवाडी शाळेच्या शिक्षिका सौ जान्हवी लोके मॅडम. केले तर आभार अंगणवाडी सेविका मनीषा सुर्वे यांनी मांडले. यावेळी ग्रामसेवक शिवराज राठोड अशोक घाडी विजय सुर्वे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ रिया सुर्वे देऊलवाडी अंगणवाडी सेविका सौ माधव, परबवाडी अंगणवाडी सेविका सौ पाडावे, घाडी पाडावेवाडी अंगणवाडी सेविका श्रीम परब मॅडम, व सर्व मदतनीस गावातील महिला वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.





