देवगड : आदर्श शाळा देवगड सडा येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदीन अर्थात शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.यावेळी इयत्ता चौथी मधील अनेक विद्यार्थी शिक्षक बनले आणि एक वेगळा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना मिळाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विद्यार्थी मनोगते व्यक्त केली गेली.

विद्यार्थी शिक्षकांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात जाऊन विविध विषयांचे अध्यापन केले. शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन विद्यार्थी रममाण झालेे.वाचन लेखन गणन या सारख्या क्रिया सहाध्यायी विद्यार्थ्यांकडून करून घेताना विद्यार्थी शिक्षक दिसत होते.शालेय वेळापत्रक प्रमाणे तासिका कामकाज हे शिक्षक करत होते.
भाषा गणित इंग्लिश हे विषय आपापल्या आवडी प्रमाणे शिकवताना पाहून आनंद वाटला .उपस्थित शिक्षकांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले असे शिक्षक सचिन जाधव व वेदा साळसकर यांनी सांगितले.या उपक्रमात इयत्ता चौथी मधील वरद बैलकर, हितेन सनगाळे,आदित्य सरकटे,ओम मणचेकर , नागरगोजे , प्रथमेश जंगले ,प्रत्योत मोंडकर ,मुस्तफा शिडवणकर ,हर्ष कोयंडे , ईश्वरी कदम लावण्या मिठबावकर ,ईश्वरी महाडीक , आराध्या जोशी , मनाली कोकरे , हर्षिका भाबल, रिशिका नायर आदि विद्यार्थ्यांनी आज शिक्षक म्हणून सहभाग घेतला. सर्व पालकांनी,शालेय व्यवस्थापन समिती ने या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांना शिक्षक वेदा साळसकर व सचिन जाधव यांनी मार्गदर्शन केले.





