सावंतवाडी : आता मराठा समाजाला कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही पक्षाने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाचा उपयोग करून घेतला. त्यामुळे आताही लढाई प्रत्येक मराठ्यांनी स्वतःची वैयक्तिक लढाई आहे, असे समजून लढली पाहिजे तरच आपण विजय संपादन करू शकतो, असे सांगून जालन्यामध्ये झालेल्या लाठी चार्ज हा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मराठा समाजाचे ज्येष्ठ सल्लागार विकास सावंत यांनी येथे केला.
मराठा बांधवांचे जे नाहक रक्त पोलीस प्रशासनाने सांडवलेले आहे, त्याचा हिशोब सरकारला द्यावाचं लागेल. हे सांडलेले रक्त मराठा समाज कधीच विसरणार नाही. या रक्ताची जबर किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना समाजाच्या वतीने निवेदन देताना शासनाला दिला आहे. आता मराठा बांधव हा गप्प बसणार नाही तर अजून पेटून उठणार असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, अर्चना घारे – परब यांनी जिजाऊंच्या लेकींवर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. मराठा समाज हा अन्याय कधीच विसरू शकत नाही. आबाल वृद्धांवर दाखल केलेले गुन्हे व संवैधानिक मार्गाने चाललेलेल्या उपोषणास गालबोट लावण्याचे केलेले काम, याला मराठा समाज कधीच विसरणार नाही, असे सांगून याचा शासनाला जाब द्यावा लागेल, असा इशारा दिला.
आज सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने येथील नायब तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. यावेळी विकास सावंत, लक्ष्मण नाईक, अर्चना घारे परब, बाळा गावडे, बाबू कुडतरकर, सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, पुडलिक दळवी, जीवन लाड, सचिन बिरोडकर, एकनाथ गावडे, विनिश तावडे, गोविंद सावंत,आनंद सावंत,अब्जू सावंत, राजन, सावंत, तानाजी पाटील, विलास जाधव, संदीप गवस, शिवदत्त घोगळे, चंद्रकांत राणे, राजू तावडे, सुधीर राऊळ, प्रा. रूपेश पाटील, उमाकांत वारंग आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





