सावंतवाडीच्या मिलाग्रीस प्रशालेचा अभिनव उपक्रम..! ; विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना दिल्या प्रथमोपचार पेट्या.

187

सावंतवाडी : आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची सुरक्षित ने – आण करणारे सर्व वाहन चालक यांना प्रथमोपचार पेटीचे वाटप प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.