कुडाळ : घोटगे-सोनवडे घाट रस्त्याचे काम भाजप भाजप सरकारच पूर्ण करेल, असा शब्द भडगाव पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भडगाव ग्रामस्थांना दिला. पणदूर – घोटगे रस्ता भडगाव येथे जुन्या पुलाच्या ठिकाणी उंच पातळीचा पुल बांधणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे, माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, अतिशय कमी वेळेत पुलाची उभारणी केल्याने अधिकारी ठेकेदाराचे कौतुक करतो.





