नवी दिल्ली : शिक्षकाच्या हत्येप्रकरणी एका चौदा वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार, लैंगिक अत्याचार केल्यामुळे मुलाने खासजी शिक्षकाची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी क्सासेस घेणाऱ्या २८ वर्षीय शिक्षकाने १४ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार करत होता. तसेच शिक्षकाने याचा व्हिडिओ बनवला होता.
पोलिसांनी मुलाला शुक्रवारी ताब्यात घेतले होते. शिक्षकाची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. बदला घेण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. ३० ऑगस्टला दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना फोन आला होता, जामिया नगरमधील बाटला हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये रक्त सांडले असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती.
दक्षिण पूर्वी दिल्लीतील डीसपी राजेश देव यांनी सांगितलं की, फोननंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना जमिनीवर मृतदेह पडलेला आढळला. मृतदेहाच्या मानेवरती आणि गळ्यावर खोल जखम झाली होती. खासगी शिक्षण आपल्या कुटुंबीयांसह झाकीर नगरमध्ये राहत होता.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन लगेच तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासानुसार शिक्षक समलैंगिक असल्याचा आरोप आहे. मुलाला तो दोन महिन्यांपूर्वी भेटला होता. त्यानंतर अनेक वेळा मुलावर त्याने अत्याचार केला. शिक्षकाने मुलासोबतचा एक व्हिडिओ बनवला होता आणि यावरुन तो मुलाला ब्लॅकमेल करत होता. तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत होता.
मृतदेह जेथे सापडला ते घर शिक्षकाच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. ती खोली भाड्याने देण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वीत भाडेकरुने खोली रिकामी केली होती. शिक्षकाने मुलाला या घरी फोन करुन बोलावलं होतं. त्यानंतर मुलाने धारधार शस्त्र घेऊन खोली गाठली आणि शिक्षकाचा गळा चिरला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





