सावंतवाडी : गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आजरा येथील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास बावळाट तिठा येथे करण्यात आली. इसाक अब्दुल नेसरीकर आणि तौसिफ नेसरीकर (दोघे रा. आजरा जि. कोल्हापुर) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी वाहतूक करण्यात येणारी तब्बल १८ गुरे जप्त करण्यास यश आले असून त्यांना फोंडा – गोवा येथील गो शाळेत हलविण्यात आले आहे. याबाबतची तक्रार वाहतूक पोलिस प्रशांत धुमाळे यांनी दिली आहे. त्यानुसार गुरे वाहतूक केल्याप्रकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.





