सावंतवाडी : कृषी पायाभूत सुविधा निधी योजना अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन नुकतेच श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे करण्यात आले. सदर कार्यशालेश प्रकल्प संचालिका श्रीमती भाग्यश्री नाईक नवरे, नोडल अधिकारी स्मार्ट सिंधुदुर्ग श्री. कुरकुटे, आयडीएम श्री. कुंभारे, बँक ऑफ इंडियाचे श्री. राठोड सर, श्री. थुटे साहेब, नाबार्ड बँक कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे श्री. शिंदे सर, व्यवस्थापक तालुका कृषी अधिकारी श्री. गोरे आणि शेतकरी/ उद्योजक तसेच माविम व उमेद अंतर्गत महिला बचत गट प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री. सद्गुरु सर यांनी केले. एआयएफ योजनेचे सादरीकरण श्री. कुरकुटे यांनी पीपीटी व व्हिडिओ दाखवून केले. श्री. थुटे यांनी बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे सांगितले. तसेच बँक प्रतिनिधी यांनी बँक प्रणाली बाबत विस्तृत माहिती दिली.

दरम्यान, उपस्थित शेतकरी यांची कर्ज आणि एआयएफ बाबत शंकाचे निराकरण केले. प्रकल्प संचालक आत्मा सिंधुदुर्ग श्रीमती नाईक नवरे यांनी उपस्थित शेतकरी यांना AIF व इतर मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी यांनी कृषी विभाग सर्वोतपारी मदत करेल, अशी ग्वाही दिली. श्री. शिंदे यांनी AIF बाबत येणाऱ्या अडचणीनीची माहिती दिली व प्रस्ताव करणे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनविणेकरिता सर्वोतपारी मदत करू,असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मीनल परब व आभार प्रदर्शन श्री. यशवंत गव्हाणे, मंडळ कृषी अधिकारी सावंतवाडी यांनी केले.





