अरे देवा..! म्हशीच्या वासराने खाल्ला गावठी बॉम्ब, झाला दुर्दैवी मृत्यू.! ; मळेवाड सडा येथील घटना ..!

439

सावंतवाडी : मळेवाड सडा येथे माळरानावर चरण करायला गेलेल्या म्हशीच्या वासराने वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला बॉम्ब खाल्ल्याने जबडा फुटून वासराचा मृत्यू झाल्याने गावठी बॉम्ब मळेवाड परिसरात शिकारीकरिता ठेवण्यात येत आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

प्रवीण दत्ताराम नाईक (रा.मळेवाड नाईकवाडी) यांनी आपली गुरे चरण्यासाठी माळरानावर सडा परिसरात सोडली होती.  यावेळी चरत असताना शिकारीसाठी ठेवलेल्या बॉम्बचा चावा म्हशीच्या वासराने घेतल्याने जबड्याला गंभीर दुखापत होत म्हशीच्या वासराचा मृत्यू झाला. याबाबत वनखात्याने चौकशी करावी व गावठी बॉम्ब धारकांवर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.