ओरोस : आज ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय टेनिक्कॉइट स्पर्धेत वेगवेगळ्या गटात एकूण अठरा संघ सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेचे सर्व सामने रोमांचक होत गेले. या जिल्हास्तरीय टेनिक्काईट स्पर्धेमध्ये १७ वर्षे मुले वयोगटात असरोंडी हायस्कूल विजयी झाले असून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे –
14 वर्ष मुली गटात – रामगड हायस्कूल – प्रथम, असरोंडी हायस्कूल – द्वितीय, कलेश्वर विद्यालय नेरुर तृतीय.
14 वर्ष मुले गटांमध्ये –
रामगड हायस्कूल – प्रथम, पोद्दार इंग्लिश मीडियम कणकवली द्वितीय, असरोंडी हायस्कूल – तृतीय
17 वर्षे मुले वयोगटात –
असरोंडी हायस्कूल – प्रथम
रामगड हायस्कूल द्वितीय
कलेश्वर विद्यालय नेरूर तृतीय
17 वर्षे मुली
रामगड हायस्कूल – प्रथम
कलेश्वर विद्यालय नेरूर – व्दितीय
19 वर्ष मुले
रामगड हायस्कूल – प्रथम
कणकवली कॉलेज – द्वितीय
कलेश्वर विद्यालय – नेरूर
19 वर्ष मुली
रामगड हायस्कूल – प्रथम
कणकवली कॉलेज – द्वितीय
कलेश्वर विद्यालय नेरुर – तृतीय





