रोटरी क्लब ऑफ बांदाचा २०२५-२६ वर्षासाठीचा नवीन पदग्रहण सोहळा संपन्न

17

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ बांदाचा २०२५-२६ वर्षासाठीचा नवीन पदग्रहण सोहळा संपन्न

रोटरी क्लब ऑफ बांदाचा २०२५-२६ वर्षासाठीचा नवीन पदग्रहण सोहळा श्री स्वामी समर्थ हॉल, बांदा येथे उत्साहात पार पडला. यावेळी शिवानंद भिडे यांनी अध्यक्षपदाची, स्वप्निल धामापुरकर यांनी सचिवपदाची आणि सुदन केसरकर यांनी खजिनदाराची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अमित मेटे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश घाटवाल, डॉ. विद्याधर तयशेटे आणि डॉ. विनया बाड उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष दिगंबर गायतोंडे, क्लब ट्रेनर मंदार कल्याणकर, इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट सीताराम गावडे, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर प्रमोद कामत, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर आनंद गावस, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी अप्पा चिंदारकर, फाउंडेशन चेअर मनसुख वसानी, सर्जंट ॲट आर्म्स हनुमंत शिरोडकर, सॅनिटेशन चेअर दिलीप घोगले, सदस्य विभाग प्रमुख नरसिंह काणेकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वगत नाटेकर, आणि बुलेटिन संपादक म्हणून विराज परब यांची निवड करण्यात आली.
या वेळी यशवंत आळवे, साईराज साळगावकर आणि दत्ताराम पावसकर यांचा क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
मावळते अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सांगितले की, “गेल्या वर्षभरात हॉस्पिटलमध्ये बेडशीट वाटप, रक्तदान शिबिर, शाळांना बेंच आणि डिजिटल बोर्ड देणे, जिल्हास्तरीय स्पर्धा अशा विविध उपक्रम आम्ही राबवले. आता मी पूर्ण वेळ क्लबसाठी काम करणार आहे.”
नवीन अध्यक्ष शिवानंद भिडे म्हणाले, “मला खजिनदार, सचिव आणि आता अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे यश क्लबचे संस्थापक मंदार कल्याणकर आणि प्रमोद कामत यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले. यावर्षी शिक्षण क्षेत्र आणि महिलांच्या प्रगतीवर जास्त लक्ष देणार आहे. बांद्यात डायलिसिस सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
अमित मेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “रोटरी म्हणजे संस्था नाही, ती लोकसेवेची चळवळ आहे. मावळते अध्यक्ष बँकेतले अर्थतज्ज्ञ होते, तर नवीन अध्यक्ष शिक्षण क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे क्लबला नवी दिशा मिळेल. हेल्थ कॅम्प, कृत्रिम पाय बसवणे, रक्त तपासणी असे उपक्रम राबवावेत. नेतृत्व ‘मी’ म्हणण्यासाठी नसून ‘आपण’ म्हणण्यासाठी असावे. कोकणातून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर घडायला हवेत.”
राजेश घाटवाल यांनी पोलिओ निर्मूलन व पाण्याच्या योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा असे सांगितले. डॉ. विद्याधर तयशेटे यांनी रोटरीचे जागतिक काम सांगून क्लबला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. विनया बाड यांनी रोटरीमुळे लोकांचा आत्मविश्वास वाढतो असे सांगितले.
या कार्यक्रमात समाजसेवक प्रभाकर शिरसाट आणि डॉ. संजय बर्वे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षणात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी सर्व कार्यकारणी सदस्य तसेच संतोष सावंत, स्वागत नाटेकर, अप्पा चिंदरकर, सिद्धेश पावसकर, सुधीर शिरसाट, प्रवीण शिरसाट, आनंद गावस, योगेश परुळेकर, नरसिंह काणेकर, आबा धारगळकर, दिलीप घोगले, दिलीप कोरगावकर, डॉ. एन. नाईक, प्रसाद सातार्डेकर, रत्नाकर आगलावे, शीतल राऊळ, फिरोज खान, रवी गवस यांसह अनेक रोटरी व रोटरॅक्ट सदस्य व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्निल धामापुरकर यांनी सर्वांचे आभार मानले.