सावंतवाडी : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत येथील मिलाग्रीस प्रशालेच्या आयुष राठोड ( १९ वर्षांखालील मुलगे) – प्रथम क्रमांक व भावेश कुडतरकर (१७ वर्षांखालील मुलगे) – द्वितीय क्रमांक ह्या दोन विद्यार्थ्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली असून त्यांची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी झाली आहे.
तसेच तिरंदाजी स्पर्धेत धैर्या गावकर (१७ वर्षांखालील मुली ) हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी डॉन बॉस्को स्कूलचे फादर रोनाल्डो वाझ, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





