देवगड : पर्ससीन जाळ्याद्वारे मच्छीमारी करण्याच्या उद्देशाने देवगड काळोशी समुद्रात 15 गावांमध्ये उभ्या असलेल्या गोवा येथील सेंट अँथनी या पर्ससिन नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झाली.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या शितल या गस्ती नौका शनिवारी समुद्रात गस्त घालत असताना देवगड काळोशी समुद्रात 15 गावांमध्ये पर्ससिन जाळ्याद्वारे मच्छीमारी करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेल्या गोवा येथील अँलेक्सो फर्नांडिस यांच्या मालकीच्या सेट अँथोनी या नौकेला मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीने पकडले आहे. या नौकेवर पर्ससीन जाळे व जनरेटर सापडला असून खलाशी वर्गाचा विमा नाही.
महाराष्ट्र जलदि क्षेत्रात पर्ससीन मच्छीमारी बंदी असताना बिगर परवाना मच्छीमारी करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेला गोवा येथील अँथोनी नौकेला पकडून देवगड बंदरात आणले असून पुढील कारवाई सुरू केली. ही कारवाई मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, सागरी सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे, संतोष ठुकरूल , अमित बांदकर, योगेश फाटक, लक्ष्मण लोके या टीमने केली.





