सिंधुदुर्ग : आज दिनांक 01/09/2023 रोजी स्थानिक अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांच्या पथकाला गोवा मुंबई महामार्गावरून कणकवलीच्या दिशेने पहाटे अवैध गुटख्याची बोलेरो गाडीतून वाहतूक होणार आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकॉन्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर, यांचे पथकाने जिजामाता चौक ओरोस या ठिकाणी सापळा रचून बोलेरो गाडी क्रमांक MH-07- AJ-2851 थांबवून गाडीतील 2 इसमांसह सदरचे वाहन अधिक चौकशी करीता सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आणून तिथे तपासणी केली असता, त्यामध्ये एकुण रुपये 7,53,980/- (सात लाख, त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी रुपये) किंमतीचा गुटखा व व सुंगधित तंबाखुजन्य पदार्थ मिळून आला. सदर गाडी चालक आरोपी अभय नारायण केसरकर, वय 43, रा. बांदा काळसेवाडी, तालुका सावंतवाडी 2) महादेव सुभाष नेवगी, वय 33 रा. इन्सुली डोबवाडी तालुका सावंतवाडी यांचे विरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (iv), 27 (3) (d) (e) सह वाचन कलम 30 ( 2 ) (अ) चा भंग कलम 59 प्रमाणे सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस टाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत.





