निवडणुका पुढे ढकलण्याचं षढयंत्र.! – संजय राऊत ; ‘वन नेशन वन इलेक्शन’ फॉर्म्युलावर आक्षेप.

35

मुंबई  केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

काल भाजपाने वन नेशन वन इलेक्शनचा फुगा सोडला. निडणूक आयोग हे भ्रष्ट आहे. इंडिया आघाडीला केंद्र सरकार घाबरलं असल्यामुळेच आमच्या बैठकीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनची म काढण्यात आली, अशी टीका राऊतांनी केली.