कुडाळ : कुमारी मानसी अनंत खोबरेकर हिची गोवा हॉस्पिटल येथे जाऊन विचारपूस करत कमशिप्र मंडळ आणि कुडाळ हायस्कूल परिवाराच्या वतीने जमा केलेली रोख रुपये 52910 एवढी रक्कम मानसीचे वडील अनंत खोबरेकर यांच्याकडे कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश आजगावकर यांनी काल सुपूर्द केली.
कुमारी मानसी अनंत खोबरेकर ही कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे. आठ दिवसांपूर्वी शाळेतून घरी जाताना डंपरच्या चाकाखाली तिचा पाय चिरडला गेला .तिला पुढील उपचारांसाठी गोवा बांबुळी या ठिकाणी दाखल करण्यात आले . तिच्या उपचारांसाठी मोठा खर्च येणार होता त्यामुळे सामान्य कुटुंबातून येणाऱ्या या विद्यार्थिनीला आपण सढळ हस्ते मदत करा असे आवाहन संस्था प्रतिनिधी व मुख्याध्यापकांनी शाळेला केले . या आवाहनाला दात देत 52910 एवढी रक्कम जमा झाली . संस्था प्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुलांनी शक्य तेवढी मदत देण्याचा प्रयत्न केला. काल मुख्याध्यापक दिनेश आजगावकर यांनी बांबुळी गोवा येथे जात मानसीचे वडील अनंत खोबरेकर यांची भेट घेतली . मानसीशी बोलून तिला धीर दिला आणि संस्था व कुडाळ हायस्कूल परिवाराने जमा केलेली रोख रक्कम एकूण 52910 अनंत खोबरेकर यांच्याकडे सुपूर्द केली . शाळा परिवाराने दाखविलेल्या सहृदयतेबद्यल खोबरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली .





