बांद्यात जिल्ह्यास्तरीय नक्षत्र काव्य मैफल उत्साहात संपन्न.!

29

बांदा : आपल्या कोकणातील कवी कवयिञींना या माध्यमातुन आपल्या रचना सादर करण्याची संधी देऊज खेडोपाडी प्रचंड साहित्यिक, कविला समाजाने जपले पाहीजे. अशा व्यासपीठामुळे माय मराठी समृध्द होते.अनेक कवी आपले प्रकाशात येतील.मंडळाचे चे कार्य हे कौतुकास्पद आहे, असे गाैरोउद्गार बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी काढले.

नक्षत्राचं देणं काव्यमंच शाखा सावंतवाडी (सिंधुदूर्ग) आयोजित जिल्ह्यास्तरीय काव्य मैफल बांदा खेमराज हायस्कूल सभागृहात उत्साहात ‘वन्स मोअर ‘ च्या जयघोषात संपन्न झाली.या काव्य मैफलीला विशेष अतिथी नाईक बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर उदघाटक म्हणुन शिक्षक,कवि, लेखक मनोहर परब, माजी मुख्याध्यापक कैलास जाधव, बांदा उपसरपंच जावेद खतीब, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

भविष्यात या व्यासपीठावरुन अनेक साहित्य उदयाला येईल. जिल्हावासियांसाठी ही आनंदाची पर्वणी आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी माजी मुख्याध्यापक कैलास जाधव यांनी काढले.

कणकवली,वेंगुर्ल्या,कुडाळ, दोडामार्ग बांदा तसेच गोव्याहुनही कविवर्य- कविवर्या सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवाह आणि कौतुक मिळविले.

नक्षत्राचं देणं काव्यमंच-महाराष्ट्र ही संस्था गेली तेवीस वर्ष विविध उपक्रम राबवित नव कविंना कवयित्रीना घडवत आहेत. त्यांना मानाचे स्थान आणि व्यासपीठ देवुन त्यांचा गौरव करीत आहेत.
या काव्यमंच चळवळीचे संस्थापक अध्यक्ष कवी वादळकार प्रा.राजेंद्र सोनवणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्ष कवी उदय सर्पे यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रेरणेने असे काव्य मैफलीचे कार्यक्रम आपल्या बांदा-सावंतवाडीमध्ये वेळोवेळी आयोजित केले जातील, असे नक्षत्राचं देणं काव्यमंच-महाराष्ट्र चे सावंतवाडी अध्यक्ष,वाफोली गावचे सुपुत्र, कवी सखाराम उर्फ कृष्णा गवस यांनी सांगितले. सूत्रसंचालन निता सावंत-गवस यांनी केले.
सुयोग्य व्यवस्थापन “माझे कुटुंब माझे नातेवाईक”या हाँटअँप ग्रुपने यशस्वीपणे केले.
यावेळी प्रत्येक कवी कवयिञीला विनामूल्य सहभाग दिला,तसेच प्रत्येकाला काव्यवाचन केल्याबद्दल आकर्षक सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सावंतवाडी विभागप्रमुख कवी सखाराम गवस यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोठी भूमिका बजावली.