मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा एक्झिट (कि.मी. क्र. ५४ / २२५) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.या कामासाठी दुपारी १२.०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णतः बंद राहील. या दरम्यान वाहनधारकांना खंडाळा एक्झिट मार्गे (कि.मी. क्र. ४८/२००) जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरुन वळवण येथील पथकर नाक्यावरुन पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून प्रवास करता येणार आहे.





