सिंधुदुर्ग : सर्वसामान्य रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी योगदान देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेच्या वाहनचालक संघटनेने आपल्या मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन व उपोषणाचा निर्धार केला आहे. अन्य राज्यात ‘समान काम, समान ‘वेतन’ दिले जात असताना महाराष्ट्रातही तसे वेतन द्यावे, अशी मागणी करत १०८ रुग्णवाहिका चालक संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या मागणीची दखल न घेतल्यास रुग्णांची हेळसांड व जीवितहानी झाल्यास त्याला शासन व संबंधित बीव्हीजी कंपनी जबाबदार राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.





