
सावंतवाडी :बहीण-भावातील अतूट नात्याचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. अवघ्या एका दिवसावर आलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त राखी खरेदीसाठी देशभरातील बाजारांत गर्दी झालेली दिसते. यंदा रक्षाबंधनानिमित्त राख्यांनी बाजार चांगले सजलेले आहेत. पारंपारिक सोबतच नवनवीन प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाले आहेत. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींना आकर्षित करणाऱ्या रंगबेरंगी राख्यांनी बाजार चांगलेच सजलेले पाहावयास मिळत आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेशात लोकांची गिफ्ट खरेदीसाठी, राखी खरेदीसाठी अक्षरश: गर्दी झाली आहे.

घरच्या घरी बनवलेल्या राख्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड, बीड्स, घुंघरू, मिरर वर्क असलेल्या राख्या अधिक लक्ष वेधून घेत आहेत.

छोट्या गावांमध्ये अजूनही गोंड्यांच्या राख्यांना मागणी आहे.

लहान मुलांनी आपल्या बहिणींकडे कार्टुनच्या राख्यांची मागणी केली आहे. लहान मुलांमध्ये छोटा भीम, मोटू पतलू, स्पायडर मॅन, किड्स टॉय, डोरेमॉन अशा राख्यांना अधिक मागणी आहे.

रुद्राक्ष, डायमंड, मोती, ओंकार राखी बाजारात उपलब्ध आहेत..

रक्षाबंधन सणासाठी रंगेबिरंगी, विविध कलाकुसर केलेल्या आकर्षक राख्यांनी बाजार फुलला आहे.





