मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची वर्णी लागली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना संधी मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खडसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.
बबन गितेंनाही संधी
त्याचबरोबर बीडचे बबन गिते यांचीही राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांची साथ सोडून बीडच्या सभेत गिते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षानं त्यांना मोठी संधी दिली आहे





