आंबोली पर्यटन फक्त नावापुरतेच.?, वेळेचं बंधन घालून लॉक केले धबधबे ; पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी.

63

सावंतवाडी : आंबोली घाटात मोठा गाजावाजा करून शुभारंभ करण्यात आलेले धबधब्यावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या धबधब्यांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. धबधबे सायंकाळी चार नंतर संबंधित यंत्रणेकडून कडून बंद केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. लॉक करण्यात आलेल्या धबधब्यामध्ये बहुचर्चित बाहुबली धबधब्याचाही समावेश आहे. या प्रकारामुळे पर्यटकांतून फार मोठी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आंबोली म्हटलं की साहजिकच डोळ्यासमोर येतात ते कड्या कोपऱ्यातून वाहणारे फेसाळ धबधबे. काही दिवसांपूर्वीच मोठ्या गाजावाजात मंत्री महोदयांच्या उपस्थित आंबोली घाटातील पाच धबधबांचे नामांकन करून पर्यटन स्थळाचा विकास करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली होती. हे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. यामुळे पर्यटन या धबधब्याखाली आंघोळ व मौज मस्ती करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र पर्यटक वाढीसाठी नवनवीन केलेल्या उपाययोजना आणि धबधब्यांचे केल्याने नूतनीकरण आता लॉक झाले आहे. काही दिवसापूर्वी आंबोली घाटातील ज्या पाच धबधब्यांचे नामांकन करून मोठा गाजावाजा करत शुभारंभ करण्यात आला होता. त्यातील काही धबधब्याकडे जाणारा मार्ग जी यंत्रणा देखभाल दुरुस्ती करते त्या यंत्रणेकडून कुलूप घालून लॉक केल्याचे निदर्शनास येत असल्याने या ठिकाणी येणारा पर्यटक त्या धबधब्यापर्यंत प्रवेशद्वाराला लॉक असल्याने तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्याने पर्यटक नाराज होऊन माघारी परत असल्याचे चित्र सध्या आंबोली घाटात पाहायला मिळते.