गौरी प्रवीण परब यांचे दातृत्व ; सामाजिक बांधिलकीच्या आरोग्य विभागासाठी साहित्य प्रदान!

41

सावंतवाडी : समाजाचं आपणही काही तरी देणं लागतो या उदात्त  भावनेतून शहरातील गौरी प्रवीण परब यांनी सामाजिक बांधिलकीच्या आरोग्य विभागासाठी सामुग्री प्रदान केली आहे.

सामाजिक बांधिलकीच्या आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी कार्याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांच्याजवळ व्हीलचेअर, कमोड चेअर, बेड, तीन वॉकर इत्यादी रुग्णपोयोगी वस्तू सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला गौरी परब यांनी दिल्या. तसेच आपण तुमच्या सामाजिक बांधिलकीचा एक हिस्सा आहे, असं समजून कधीही गरज भासल्यास हाक द्या, असंही त्यांनी सांगितलं.

संजय पेडणेकर व सामाजिक बांधिलकीच्या टिम ने त्यांच्या या सेवाभावी कार्याचे तोंड भरून कौतुक केले. गौरी परब यांनी दिलेल्या या रुग्णपोयोगी वस्तूंची सेवा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गरजू लोकांना विनामूल्य दिली जाईल. तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक नम्र आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या वस्तू दानशूरांनी सामाजिक बांधिलकीला दिल्या तर गोरगरीब व गरजू रुग्णापर्यंत त्या वस्तू विनामूल्य तत्त्वावर दिल्या जातील त्याचा फायदा जेणेकरून गोरगरीब रुग्णांना होईल, असे आवाहन संजय पेडणेकर यांनी केले आहे.