”मला नाही व्हायचं समन्वयक..!” – नितीश कुमार चिडले ; लालूंनी केला गेम..?

37

नवी दिल्लीः इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच नितीश कुमार यांनी आपल्याला इंडिया आघाडीचं समन्वयक पद नकोय, असं विधान केलंय. त्यांच्या या भूमिकेमागे लालूंची चाल असल्याचं बोललं जात आहे. या राजकारणामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झालीय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विरोधी पक्षांना एकत्रित आणत आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमार यांनीच प्रयत्न केले होते. मात्र आज जेव्हा विरोधक सक्षमपणे एकत्र येत आहेत तेव्हा मात्र नितीश कुमार महत्त्वाच्या पदापासून दूर राहण्याची भूमिका घेत आहेत. त्यांनीच याबाबत एक विधान केलं आहे.

नितीश कुमार यांनी सोमवारी सांगितलं की, मला विरोधी आघाडीचा समन्वयक व्हायचं नाही. या पदाची जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल. आमचा प्रयत्न सर्वांना सोबत ठेवण्याचा आहे. नितीश कुमारांचा समन्वयकांमध्ये समावेश होईल, अशी चर्चा सध्या सुरु होती. परंतु त्यांच्याच विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे.