वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हयाचे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या गणेशोत्सवात तालुक्यातील विज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनी ला सूचना करण्यात यावी. तसेच गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील विकासात्मक कामे मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली.





