देवगड : देवगड शहरातील रिक्षा चालक – मालक संघटनेचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेसाठी रीक्षा संघटनेच्या वतीने बनविलेले रिक्षाचे
मखर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय व ठरले आहे.
देवगड शहरातील रिक्षा चालक – मालक संघटना देवगड मध्ये किमान 45 वर्षे कार्यरत आहे. साधारणत: दहा ते बारा वर्षांपूर्वी रिक्षा चालक-मालक संघ देवगड शहर या नावाने धर्मदाय आयुक्त ओरोस यांच्याकडे नोंदणी देखील करण्यात आलेली आहे. दरवर्षी 21 जानेवारीला रिक्षा चालक-मालक संघटनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यानिमित्त सत्यनारायनाच्या पूजेचे आयोजन केले जाते.
या पूजेसाठी दरवर्षी वेगवेगळी मखरे बनवली जातात. यावर्षी रिक्षाची प्रतिकृती बनवावी असा त्यांचा मानस होता त्यानुसार ही प्रतिकृती असलेले सुंदर व आकर्षक मखर रवी कांदळगावकर व त्यांचे सहकारी यांनी बनवले होते. आपला व्यवसाय ज्या रिक्षावर चालतो त्याच प्रतिकृतीचे मखर बनविल्याने ही रिक्षाची प्रतिकृती इतकी सुबक आणि आकर्षक होती की याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पूजेला आलेल्या प्रत्येक भाविकाचा मोह मखर पाहून आवरताना दिसत नाही.
प्रत्येकजण याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसत आहेत. रिक्षा चालक-मालक संघ देवगड शहराचे अध्यक्ष अनिल बांदकर ,उपाध्यक्ष सिद्धार्थ नाडणकर, सचिव रवींद्र, शेलार खजिनदार, दिनकर राजम, सदस्य अभय पवार ,ज्ञानदेव मांजरे, चंद्रकांत येरम, रवींद्र कांदळगावकर, प्रमोद प्रभू, पद्माकर राऊत, व सर्व रीक्षा चालक-मालक संघाचे पदाधिकारी आपला हा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करताना दिसतात.





