देवगड : एस.ए.ई. आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्या संयुक्त विदयमाने “अ वर्ल्ड इन मोशन” (अविम -देवगड लोकेशन) या शैक्षणिक उपक्रमांतर्गत महिंद्रा ऍन्ड महिंद्रा कंपनी तर्फे हा उपक्रम CSR अंतर्गत दर वर्षी सुरु असतो. या शैक्षणिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जेट टॉय या स्पर्धेचा शुभारंभ महिंद्रा कंपनीचे देवगड सिटी लीडर संजय मालप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धेत अनुक्रमे केंद्र शाळा आरे देवाची वाडी प्रथम क्रमांक, कोटकामते शाळा नंबर 1 या शाळेने व्दितीय क्रमांक पटकावला.
देवगड तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय येथे दिवसभर झालेल्या या अनोख्या कार्यक्रमात देवगड तालुक्यतील 10 शाळांनी सहभाग घेतला होता. कुवळे केंद्र शाळा भुजबळ सर, कुंभार सर, कोटकामते नं.१ शाळा – मुणगेकर सर, मराठे सर – शाळा पाठथर, जाधवर सर केंद्र शाळा आरे देवीची वाडी, शाळा कुणकेश्वर नं.१ जगदीश गोगटे सर, शाळा टेंबवली कालवी-येरागी सर, शाळा देवगड नं.१ मोंडकर मॅडम, शाळा कुणकेश्वर कातवण अविनाश राणे सर, शाळा जामसंडे भडसाळे दळवी सर, शाळा इळये नं.१ धर्मराज धुरत सर आधी शाळांचा व शिक्षक वर्गाचा समावेश होता. त्याच प्रमाणे या वेळी विदयार्थ्यांनी आपली संशोधनवृत्ती आणि कल्पकतेचे अनोखे दर्शन घडविले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता संघ पुणे येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी थेट सहभागी होणार आहे.
व्यावसायिक सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी (सीएसआर) महिंद्राने सहावीच्या विदयार्थ्यांसाठी “अविम” या उपक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत विदयार्थ्यांना सारख्याच प्रमाणात पुरविल्या गेलेल्या साहित्याच्या माध्यमातून जेय टॉय करण्याची स्पर्धा झाली. तयार केलेल्या प्रकल्पांची त्यांच्या अधिकतम क्षमतांच्या मूल्यमापनाच्या आधारे निवड करण्यात आली. त्यात अधिकाधिक अंतर चालणे, वजन वाहून नेणे, ठरलेल्या ठिकाणी थांबणे, जलद गतीने चालणे अशा चाचण्या व भविष्यातील इंजिनियरींगमधील आव्हाने, त्यावरील इनोव्हेटिव्ह आयडीया सादरीकरणाचा समावेश होता.
अविममध्ये यंदा जिह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण, देवगड या तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ११ शाळांनी सहभाग घेतला होता. यांना शिक्षक आणि महिंद्राचे स्वयंसेवक यांचे सहकार्य मिळाले. यावेळी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा अधिकारी समीर वंजारे, संजय मालप, समीर माडये, शाळा शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हयातील विदयार्थ्यांना इंजनियरींगची आवड निर्माण व्हावी व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक सुबोध यशवंत मोरे यांनी हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांसाठी सामाजिक बांधिलकी उपक्रमातून उपलब्ध करून दिला आहे.





