सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अधीक्षक पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. त्यानंतर युवा रक्तदाता संघटनेकडून डॉ. ऐवळे यांची भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचे उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांंसह येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी लक्ष वेधले. रक्तपेढीतील रिक्तपद देखील भरण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. ऐवळे म्हणाले, येत्या आठ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील विभागाची बैठक घेऊन त्याबाबतच्या सुचना केल्या जाणार आहेत. डॉ.क्षमा देशपांडे, डॉ.मुक्तानंद गवंडळकर यांसारखे भुलतज्ञ उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत असल्यानं शस्त्रक्रिया करण शक्य होत आहे. रूग्णालयाकडून चांगली रूग्णसेवा देण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील असं डॉ. ऐवळे म्हणाले. यावेळी झाडाच रोप भेट स्वरूपात देत डॉ. ऐवळे यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी देव्या सुर्याजी, महेश भाट,अनिकेत पाटणकर, मेहर पडते, अर्चित पोकळे, डॉ. मुरली चव्हाण, राजू धारपवार, वसंत सावंत, साईश निर्गुण, देवेश पडते, पांडुरंग वर्दम आदी उपस्थित होते.





