अभिमानास्पद ..! बस चालकाचा मुलगा झाला अधिकारी ; रूपेश कांबळे यांचे MPSC परीक्षेत उत्तुंग यश .!

324

सावंतवाडी : सावंतवाडी एस. टी. आगारातील सेवानिवृत्त चालक रमेश कांबळे यांचा सुपुत्र रूपेश कांबळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका कृषी अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून त्याने पदवीचे शिक्षण घेतलले असून सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आरपीडी ज्युनिअर कॉलेजचा तो माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कांबळे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.