बांदा : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने बांदा वाफोली रोडवर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना पिकअप वाहनासह अं. 17,49,220/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आज दि. 26/08/2023 रोजी श्री. विजय सूर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, श्री. सुनील चव्हाण, संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर, श्री. वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बांदा-वाफोली रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ, बाफोली ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे महिंद्रा कंपनीचे सफेद रंगाचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र. MH-48-CB-3259 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रिकामे प्लॅस्टिकचे कॅरेट व खराब नारळाचे शहाळ्यांखाली गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 150 बॉक्स बिअरचे 08 बॉक्स अवैध साठा मिळून आला. आरोपी इसम नामे. आंबादास पोपट आहिरे ऊर्फ आंबादासभाई पोपटभाई आहिरे, वय 40 वर्ष, रा. 687 दहिवड, ता. देवळा, जि. नाशिक-423102 यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं. रु.8,64,000/- किंमतीचे मद्य व अं. रु.30,720/- किंमतीची बिअर तसेच रु.8,50,000/- किंमतीचे चारचाकी वाहन व मद्य / बिअर साठा लपविण्यासाठी वापरलेले रु. 4500/-रु. किंमतीचे 30 प्लॅस्टिकचे रिकामे कॅरेट तसेच 700 खराब नारळाचे शहाळे असा एकुण अं. रु.17,49,220/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, अमित पाडळकर, निरीक्षक, रा.उ.शु. कुडाळ, तानाजी पाटील, प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, स.दु नि, प्रसाद माळी जवान, व रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली.
सदर प्रकरणाचा अधिक तपास संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.





