देवगड : आरे ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट 2023 रोजी श्री. आरेश्वर हायस्कूल,आरेला सॅनिटरी पॅड डिस्पोजर मशीन देण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
श्री. कांबळे म्हणाले, आपण आपल्या समस्या आपल्या ग्रामपंचायतीकडे मांडा. म्हणजे ग्रामपंचायत आपल्या स्तरावरून तशा उपाययोजना करतील. आपण विद्यार्थी म्हणून मोबाईलचा वापर किती प्रमाणात करावा, यावर काहीतरी बंधन असलं पाहिजे. मोबाईलच्या मार्फत गुगल सर्च इंजिन वरून तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक त्या गोष्टी निश्चितच उपलब्ध होतील. पण मनोरंजन म्हणून फेसबुक, व्हाट्सअप, रील बनवणे यामध्ये वेळ घालवू नका. यापुढे निर्भया अंतर्गत आपल्या स्कूलमध्ये देवगड पोलीस स्टेशन मार्फत कार्यक्रम आयोजित ग्रामपंचायत मार्फत करण्यात येईल यामध्ये मुलींना सतत उद्भवणाऱ्या संकटांवर कशी मात करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल शेवटी आपण चांगला अभ्यास करून आपल्या गावाचं आपलं नाव मोठ करा, अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी व्यासपीठावर आरे सरपंच सौ. ममता कदम, उपसरपंच रत्नदीप कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी उपसरपंच महेश पाटोळे, मुख्याध्यापक खोचरे सर, ग्रामसेवक केतन जाधव, आशा स्वयंसेविका प्रेरणा कांबळे, अंगणवाडी सेविका अपेक्षा कोकम मॅडम, प्रगती मेस्त्री, मदतनीस दीपा कदम, शिंदे सर, फाळके सर, कर्मचारी तळवडेकर, खरात, लोके व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत श्री. खोचरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन फाळके सर यांनी केले.





