युवराज सिंग दुसऱ्यांदा झाला बाबा ; चाहत्यांसोबत परीची पहिली झलक केली शेअर!

61

अमृतसर : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी व अभिनेत्री हेजल कीचने मुलीला जन्म दिला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून युवराजने आपल्या चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. युवराजने  सोशल मीडियावर आपल्या लाडक्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. चाहतेमंडळी व सेलिब्रिटींकडून या पोस्टवर शुभेच्छा व लाइक्सचा वर्षाव होत आहे.

लाडक्या लेकीचे नाव देखील सांगितलं

युवराज सिंग आणि हेजल कीचने आपल्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘झोपेशिवाय असलेल्या या रात्री अधिक आनंदी वाटत आहेत. कारण आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमची राजकन्या ऑराचे स्वागत केले आहे.’ युवराजने आपल्या परीला कुशीमध्ये घेतले आहे तर फोटोमध्ये दुसरीकडे हेजल कीच आपल्या मुलाचा सांभाळ करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो अगदी परेफक्ट फॅमिली फोटो दिसतोय.