नवी दिल्ली : डब्लूडब्लूई चा प्रसिद्ध चॅम्पियन खेळाडू ब्रे व्हॅट्ट याचे निधन झाले आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. कंपनीचा प्रमुक कंटेट ऑफिसर आणि माजी चॅम्पियन पॉल उर्फ ट्रिपल एच याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याने एक्सवर पोस्ट केली आहे.
ट्रिपल एच याने पोस्टमध्ये म्हटलंय की, मला आत्ताच फोन आला आणि कळवण्यात आलं मी आमचा साथीदार आता जगात नाही. विंधम रोटूंडा Windham Rotunda उर्फ ब्रे व्हॅट्ट WWE कुटुंबातील एक सदस्य होता, पण त्याने अचानकपणे एक्झिट घेतली आहे. ही खूप दु:खद घटना आहे. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. सर्वांनी ब्रे व्हॅट्टचा खासजीपणाचा आदर करावा. माहितीनुसार, ब्रे व्हॅट्टचे खरं नाव विंधम रोटूंडा असं आहे.गेल्या काही महिन्यांपासून तो WWE पासून अलिप्त होता. काही आरोग्यसंबंधी अचडणींमुळे तो बाहेर पडला होता. तो २००९ पासून WWE सोबत होता. २०२१ मध्ये त्याची WWE मधून काही अज्ञात कारणामुळे मुक्तता करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा तो WWE जॉईन झाला होता.
TMZ नुसार, ब्रे व्हॅट्ट तीनवेळा WWE चा विजेता होता. यात एकदा WWE चॅम्पियन आणि दोनवेळा तो WWE युनिव्हर्सल चॅम्पियन होता. WWE मधून त्याने २०१८ आणि २०१९ मध्ये ब्रेक घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा नव्या रुपात WWE मध्ये आला होता. त्याचा निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या ३६ व्या वर्षी त्याने आयुष्यातून एक्झिट घेतल्यामुळे अनेकांचा या बातमीवर विश्वास बसत नाहीये.





