खारेपाटण : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङमय मंडळ व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने ग्रंथालय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी वाङमय प्रमुख प्रा. रश्मी देसाई यांनी प्रमुख वक्त्या म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी जीवनातील पुस्तकांचे असणारे महत्व सांगून जीवनातील पुस्तकांचे स्थान अधोरेखित केले. प्रा. वसीम सय्यद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.





