बांदा : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात भारत संचार निगम,सावंतवाडी यांनी मोबाईल टॉवरचा मनोरा उभारला होता.सदर मनोर्याची बॅटरीची कोणी अज्ञातांनी चोरी केल्याने डेगवेतील ग्रामस्थांना मोबाईल रेंज अभावी गेले वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागला होता.
याबाबतीत गावातील ग्रामपंचायत,ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विजय देसाई यांनी संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटी व लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे ठराविक उत्तरापलीकडे काही हालचाल नव्हती. म्हणून भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ आँगस्ट२०२३ रोजी सदर कार्यालयाच्या सावंतवाडी येथील आवारात बेमुदत उपोषणास विजय देसाई हे बसले होते.
यावेळी भारत संचार निगम सावंतवाडीचे उपमहाप्रबंधक आर. व्ही. जन्ही यांनी व इतर अधिकारी यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.व होणाऱ्या विलंबाचे कारण सांगितले.व सदर बाबतीत व्यक्तीगत लक्ष देऊन येत्या १५ दिवसापुर्वी सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी पत्र उपोषणाच्या दिवशी दिले होते. त्यामुळे सदर उपोषण त्वरित मागे घेतले होते.
जर सदर कालावधीत कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास परत त्याच ठिकाणी परत उपोषणास बसणार असल्याचे जाहीर त्याच वेळी जाहिरकेले होते.
सदर बाबतीत संबंधित अधिकारी यांनी सत्वर दखल घेऊन आज अखेर संबंधित अधिकारी यांनी डेगवे गावातील मोबाईल मनो-याची बॅटरी आज बसविण्यात आली आहे.
त्यामुळे संबंधित अधिकारी यांचे तसेच याकामात पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे,लोकप्रतिनिधीचे व पत्रकार बंधूचे मनापासून आभार डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी व्यक्त केले आहेत.





