सावंतवाडी : नगरपालिकेत सत्तेत असताना भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांची भूमिका व्यापाऱ्यांच्या विरोधात राहीलेली होती. व्यापारी आणि नगरपरिषद असा त्यावेळी संघर्ष शहराने बघितला होता. भाजी मंडईतील व्यापारी वर्गाला गणेशोत्सवपर्यंत मुदत देण्यात यावी हे योग्य आहे. परंतु, कोरोनाकाळात व्यापाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपची आताची भूमिका ही दुटप्पी भूमिका आहे. भाजपचा हा राजकीय स्टंट आहे. नगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपची ही खटपट सुरू आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे.





