अपघात होवून कार दरीत कोसळली ; साटेली खिश्चनवाडी येथील घटना.

524

सावंतवाडी : साटेली खिश्चनवाडी येथे सातार्डाहून मळेवाडच्या दिशेने जाणारी हुंडाई वेरना गाडी डांबरी रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे घसरल्याने रस्त्याच्या बाजूला जात दहा ते पंधरा फूट दरीत कोसळली. नशीब बलवत्तर असल्याने वेरना गाडीच्या एअरबॅग ओपन झाल्यामुळे गाडीचा चालक बालंबाल बचावला आहे.

चिरेखाणीच्या गाडीच्या चाकांना लागून येणारी चिखलयुक्त माती रस्त्यावर पसरल्याने अपघाताला कारणीभूत ठरत आहे. याच चिखल युक्त मातीवर सदरची गाडी घसरून गाडीला अपघात झाला आहे. गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे.  मात्र युवक बचावला आहे. सदर ठिकाणी अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.