‘महाराष्ट्र माझा’च्या दणक्यानंतर नगरपरिषदेला आली जाग ; ‘त्या’ अर्धवट केलेल्या कामाला झाली सुरुवात..!

1346

सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा परिसरातील आयुर्वेदिक कॉलेज शेजारील वालावलकर पाणंद येथील रस्त्यांच्या शेजारी वाढलेली झाडी नगरपालिका प्रशासनाने बुधवारी अर्धवट तोडल्याने तेथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ‘महाराष्ट्र माझा’ ने गुरुवारी बातमी प्रकाशित केली होती.

या बातमीची दखल घेत सावंतवाडी नगरपरिषदेने आज सकाळीच उर्वरित कामाला सुरुवात केली आहे.
‘महाराष्ट्र माझा’च्या दणक्याने सदर कामाला सुरुवात झाली, हे आता स्पष्ट झाले आहे. या कामाला सुरुवात झाल्याबद्दल येथील नागरिकांनी महाराष्ट्र माझाला धन्यवाद दिले असून नगरपरिषदेने या वृत्ताची दखल घेत कामाला सुरुवात केल्याबद्दल नगरपरिषदेचेही आभार मानले आहेत.