नीलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर – आनंद वराडकर

26

कुडाळ : कुणकवळे दुर्गादिवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामासाठी १० लाख रु. व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख निधी आपल्या माध्यमातून मंजूर केला, असे सांगत वैभव नाईक यांनी या कामांची भूमिपूजन केले. मंदिर कमिटी अध्यक्ष या नात्याने मी तिथे गेलो. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला १५ लाख निधी माजी खा. नीलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून झाला हे स्पष्ट झाले, अशी टीका आनंद वराडकर यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून केली आहे.