अमळनेर : तत्कालीन मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले जळगावच्या अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय 90) यांचे निधन झाले. मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुलाबराव पाटील हे 3 वेळा एकूण 13 वर्षे जनता दलाचे आमदार राहिले. मायबोली अहिराणी भाषेतून शपथ घेईल, असे म्हणत त्यांनी संपूर्ण विधानसभेसह राज्याचे लक्ष वेधले होते. दमदार व बिनधास्त वकृत्व शैलीसाठी ते ओळखले जात होते.





