Home अपघात ‘त्या’ दुचाकी चोरास उद्या गोवा पोलीस ताब्यात घेणार..? ; ‘हे’ आहे कारण..!

‘त्या’ दुचाकी चोरास उद्या गोवा पोलीस ताब्यात घेणार..? ; ‘हे’ आहे कारण..!

1202

मळेवाड : सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हुसेन मुजावर याने घातलेले जॅकेट गोवा येथून दुचाकी चोरली होती त्या चोरलेल्या गाडीच्या डिक्कीमध्ये सदरचे जॅकेट होते. त्यामुळे आजच्या आरोस येथील दुचाकी चोरीमधील संशयित आरोपी मुजावर याने आज तेच जॅकेट घातले होते. सोशल मिडियावरिल बातमीतील फोटोतील जाकीट बघून गोवा येथील पेडणे येथे दुचाकी चोरी गेलेले मालकाने सावंतवाडी पोलीस स्टेशन गाठले आहे. सावंतवाडी पोलिसांनी संशयित आरोपीस आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयानेजामीन मंजुर केला आहे. मात्र उद्या पेडणे गोवा पोलीस संशयित आरोपी मुजावर याला ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे.