नोएडा : भारतात सध्या लव स्टोरीजचा फिव्हर सुरु आहे की काय अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात आता पुन्हा एक नवे ट्विस्ट आले आहे. सीमानंतर आणखी एक युवती बांग्लादेशातून भारतात आली आहे. पाकिस्तानातून ग्रेटर नोएडामध्ये आलेल्या सीमा हैदरवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले. ती पाकिस्तानची हस्तक आहे. ती भारतात एका मिशनसाठी आली आहे. तिचं प्रेम, लग्न हे सारं खोटं आहे. अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच सीमावर एका निर्मात्यानं चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला असून त्या चित्रपटाचे गाणेही प्रदर्शित झाले आहे.
सीमा हैदर हे प्रकरण शांत होत नाही तोच सानिया अख्तर नावाची आणखी एक युवती बांग्लादेशातून नोएडामध्ये आली आहे. तिनं देखील सौरभ नावाच्या व्यक्तीशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात होणार असून या सगळ्या प्रकारात नेमका कुणाचा हात आहे, कुठल्या कारणासाठी या गोष्टी घडत आहेत की घडवून आणल्या जात आहेत असा प्रश्न तपास यंत्रणासमोर उभा राहिला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाक्यावरुन सानिया ही तिच्या मुलांना घेऊन नोएडामध्ये आली आहे. तिनं पोलिसांकडे तक्रारही दिली आहे. तिला एक वर्षांचा मुलगाही आहे. सानिया ही बांग्लादेशातून व्हिसा घेऊन पती सौरभ कांत तिवारीकडे आली आहे. तिनं सांगितलं आहे की, तीन वर्षांपूर्वी त्यानं तिला सोडले होते. त्यानं नोएडामध्ये राहणाऱ्या एका महिलेशी विवाह केलासानियाला एक मुलगा असून तो आता एक वर्षांचा झाला आहे. काही दिवसांपूर्वी सौरभ हा भारतात परत आला. त्यानंतप तो पुन्हा बांग्लादेशला गेला नाही. यानंतर आता सानिया भारतात आली असून तिनं सौरभ भारतात दुसऱ्याच महिलेसोबत राहत असल्याचा आरोप केला आहे. सानिया दहा दिवसांपूर्वीच बांग्लादेशातून भारतात आली आहे. होता. त्यानंतर तो बांग्लादेशमध्ये आल्यावर त्याच्याशी ओळख झाली. आमच्यात प्रेम होऊन आम्ही लग्न केल्याचे सानियानं पोलिसांना सांगितले आहे.





