सावंतवाडी : राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या सौजन्यानं कोकणचा अभिमान गणेशोत्सव सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी अल्प दरात लक्झरी बस सेवेचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग युवा गृप, पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून दिनांक 16, 17 व 18 सप्टेंबर 2023 रोजी खास गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या समस्त सिंधुदुर्गवासीयांना अल्प दरात लक्झरी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.





