Home अपराध खळबळजनक… गरोदर युवतीची मोटार सायकल चोराला साथ ; आरोसच्या जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग...

खळबळजनक… गरोदर युवतीची मोटार सायकल चोराला साथ ; आरोसच्या जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले।

3402

मळेवाड : तालुक्यातील आरोस मधलीवाडी येथील संदेश देऊलकर यांच्या घरासमोरिल दुचाकी चोरून घेवून जात असताना जागरूक ग्रामस्थांनी पाठलाग करुन एक युवक आणी एका युवतीला आज (मंगळवारी ) पहाटे ४ वाजताच्या दरम्यान पकडले. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना संपर्क केल्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही संशयिताना ताब्यात घेवून वैद्यकीय तपासणीकरीता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून आले. दोन्ही संशयिताकडे चौकशी केली असता सदरचा युवक सावंतवाडी येथील हुसेन मुजावर तर युवतीने आपले नाव वेदिका देसाई असे सांगितले आहे. सदर युवती गरोदर असल्याचे तपासणी दरम्यान निदान झाले आहे. मात्र सदरची नावे खरी की खोटी आहेत याबाबत संशय आहे. दुचाकी चोरांना पकडल्याची बातमी समजतात आरोस परिसरात पसरल्यावर याच परिसरातील धोंडू गाळेलकर यांची आणखीन एक दुचाकी स्पेंलडर आजच्या रात्री चोरीला गेल्याची घटना घडली असल्याचे वृत्त आहे. यामुळे अजून पकडलेल्या चोरांची दुचाकीची चोरीची टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी पोलीस हवालदार एस. एन. टाकेकर, पोलीस कॉन्स्टेबल एस. आर. पाटील पुढील तपास करत आहेत.