कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतनजीक आज सकाळी दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली. या धडकेत पावशी बोरभाटवाडी येथील मोटर सायकल स्वार अरुण शंकर घारे (वय 65) जागीच ठार झालेत. तर त्यांच्या समवेत असलेले सेवानिवृत्त पोलीस श्री. पावसकर गंभीर जखमी झालेत. त्याना उपचारासाठी ओरोस येथे नेण्यात आले.
मात्र, हा अपघात अनधिकृत मिडलकटमुळे झाला असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.





