
कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता आणि हायवे संदर्भात अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे दिनांक २३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान कोकणात पदयात्रा करणार आहे. या पदयात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या दौऱ्याविषयी आज कुडाळ येथे झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही महत्त्वपूर्ण बैठक कुडाळ येथील रेस्ट हाऊस येथे मनसे कामगार सेना सरचिटणीस, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे व मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी तसेच माजी संपर्क अध्यक्ष मालवण राजु साटम यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
दौऱ्यावेळी कणकवली ब्रिजचे झालेले निकृष्ट काम व कमकुवतपणा, हायवे वारंवार एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघातग्रस्त जागा, आवश्यक असलेले ब्रिज, सिंधुदुर्ग जिल्हा MH07 टोल माफी संदर्भातील तसेच हायवेलगत असलेल्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली माती उत्खनने उंचवट्यां भागाची माती घसरून दुर्घटना होऊ शकणाऱ्या जागांची पाहणी. करून त्याबाबत ठोस व योग्य कारवाई व्हावी त्यावर संबंधित हायवे प्राधिकरणाकडे व केंद्र सरकारकडे मनसेच्या वतीने मागणी करणार आहे.
तत्पूर्वी मुंबई गोवा मार्ग विषयी समस्यांबाबत तसेच वारंवार होत असलेले अपघातग्रस्त जागा, नित्कृष्ट बांधलेले पूल याबाबतच्या कामांची पूर्तता होईपर्यंत टोलनाके बंदच ठेवावेत याबाबतची धडक चर्चा मनसेचे गजानन राणे व संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक यांच्या वतीने सावंतवाडी व ओसरगाव टोल हायवे अथोरिटी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी चर्चा करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. .सदर बैठकीस कुडाळ, मालवण, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते





