सावंतवाडी : जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेतील विद्यार्धी कु. शुभमन संदीप सावंत (१४ वर्षांखालील मुलगे) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी कौतुक केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





