मुंबई : काँग्रेसमधल्या मोठ्या गटामध्ये धुसफूस सुरु असून हा गट महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतो, असा गौप्यस्फोट शिंदे गटातल्या खासदाराने केला आहे. मागच्या वर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर मागच्याच महिन्यात राष्ट्रवादीत बंड झालं. आता काँग्रेसमध्ये फूट पडू शकते, असा दावा करण्यात आलेला आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी हा दावा केलाय. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसमधला मोठा गट नाराज आहे. हा बड्या नेत्यांचा गट अस्वस्थ असल्याने ते लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहेत. हे नेते महायुतीमध्ये सहभागी होतील, असा दावा जाधवांनी केलाय.





