जय हो….भारताने मालिका घातली खिशात ; आयर्लंडचा दुसऱ्या सामन्यात ३३ धावांनी पराभव..!

46

डब्लिन : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2 – 0 अशी खिशात घातली. भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंविरूद्ध विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूत 40 धावा चोपल्या.

संजू आणि ऋतुच्या 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूत 38 धावा करत भारताला 180 च्या पार पोहचवले. त्याला शिवम दुबेने 16 चेंडूत नाबाद 22 धावा करत चांगली साथ दिली.