पंतप्रधानांनी केलेले हस्तांदोलन हे माझे भाग्यच : दीपक केसरकर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे काही नेते हजर नव्हते याबाबत प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी मुंबईमधील संबंधित आमदार, खासदार हजर होते. मात्र निमंत्रण पत्रिकेमध्ये काही जणांची नावे वगळली गेल्याचे त्यांनी मान्य केले तसेच ही तांत्रिक चूक असू शकते असे दीपक केसरकर यांनी सांगितले. तर मंत्रिमंडळापैकी केवळ दीपक केसरकर यांना पंतप्रधान यांनी हस्तांदोलन केले याबाबत विचारले असता, पंतप्रधान हे खूप मोठे आहेत त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले हे माझे भाग्यच आहे असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले.